Breaking News
recent

तब्बल १५ वर्षांनी होत असलेल्या कृउबास निवडणुकीत १६८ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

 


मलकापूर 

 तब्बल १५ वर्षांनी निवडणूक होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये इच्छूक उमेदवारांची चांगलीच रैलचैल पाहायला मिळत असून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १६८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून शेतकऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिलेला अधिकारामुळे उमेदवारी अर्जामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली.

राज्यातील मुदत संपलेल्या २४९ पैकी निवडणुकीस पात्र असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी प्राधिकरण सचिवांनी २१ मार्च रोजी घोषित केला. या बाजार समितींमध्ये २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता चांगलाच राजकीय धुरळा  उडणार असून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अगोदर आलेले ३९ मिळून असे सर्व मिळून १६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखे नंतरच या निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार असलेतरी अर्ज ०८ निवडणुकी बाबत सर्वत्र एकच चर्चा रंगत आहे.

१६८ उमेदवारांमध्ये सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण ७ जांगासाठी ६२ अर्ज, तर २ उमेदवारी अर्ज २६ सहकारी संस्था महिला राखीवमध्ये २ जागांसाठी १३ अर्ज, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय राखीव १ जागेसाठी १७ अर्ज, तर सहकारी संस्था निराधीसूचित विमुक्त जाती/ भटक्या जमाती १ जागेसाठी ८ अर्ज, ग्राम पंचायत मतदार संघातील सर्वसाधारण २ जागांसाठी २६ अर्ज, ग्राम पंचायत अनुसूचित जाती/जमाती १ जागेसाठी ९ अर्ज, ग्राम पंचायती मतदार संघातील आर्थिक दुर्बल घटकातील १ जागेसाठी ८ अर्ज, व्यापारी व अड मतदार संघात २ जागांसाठी १६ अर्ज, हमाल - मापारी १ जागेसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे

Powered by Blogger.