समाजकार्य महाविद्यालयात भीमजयंती साजरी.
मलकापूर :--स्थानिक दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात आज दि 14/4/2023 रोजी समता न्याय पर्व अभियान अंतर्गत संविधानाचे महत्व या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा ज्योतिबा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह दीक्षित होते प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर ऍड बापट साहेब, ऍड दिलीप कोलते, ऍड. संजय वानखडे उपस्थित होते. या कार्यक्रमात ऍड कोलते यांनी भारतीय संविधान पण. संविधानाचे महत्व मांडत असतांना सांगितले की, संविधान हेच एकमेव असे साधन जे विविधतेतही एकता व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यात यशसस्वी झाले आहे. या सोबतच, संविधान प्रक्रिया, संविधानातील विविध कलम, मूलभूत हक्क, कल्याणकरी राज्य, न्यायपालिका इ. विषयावर मान्यवरांनी व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचेही समायोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्थाविक तुळशीराम धुरंधर यांनी केले तर आभार प्रा. विजय पिंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सह विद्यार्थीही मोठया प्रमाणात उपस्थित होते.