Breaking News
recent

दैनंदिन जीवनात चंचल मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना एकमेव पर्याय. यश कल्याणकर

 


नांदुरा दि .१८ एप्रिल ( प्रतिनिधी) दैनंदिन जिवनात मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हा एकमेव पर्याय आहे असे स्पष्ट प्रतिपादन यश कल्याणकर यांनी व्यक्त केले.तो धम्मअनाकुला विपश्यना केंद्र खापरखेडा व विपश्यी साधक नांदुरा यांच्या वतीने ट्रामा केअर सेंटर ,नांदुरा येथे आयोजित किशोरवयीन मुलांच्या शिबिराच्या मंगल मैत्रीनंतर आपले अनुभव कथन करतांना सांगितले.  सामुहिक  जिवनात जेव्हा मनात दुष्ट विचार निर्माण होतील तेव्हा विपश्यनेमुळे मी ते रोखून माझ्यासोबत इतरांचेही कल्याण साधू शकतो असेही तो पुढे म्हणाला.ह्यावेळी प्रतीक तायडे व ओम राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

आचार्य सत्यनारायणजी गोयंका गुरूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त  करण्यासाठी संपूर्ण देशात शंभर विपश्यना शिबिर ( जिप्सी कॅम्प ) आयोजित करण्यात येत आहे.त्यानुसार नांदुरा येथे देशातील पहिले पुरूष व महिलांकरीता दहा दिवसीय शिबिर दि.२६ फेब्रुवारी ते ९ मार्च व दि १२ मार्च ते २३ मार्च पर्यंत  आयोजित करून यशस्वी केले. त्यानंतर लोकांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन तिसरे पुरूषांकरीताचे शिबिर यशस्वी करण्यात आले. त्यानंतर शेगांव येथील श्री संत गजानन महाराज इंजिनिअर काॅलेजच्या किशोर वयीन मुलांकरीता  ( टीनेजर कोर्स) शिबिराचे आयोजन दि.१० मार्च ते १८ मार्च पर्यंत आयोजित  करण्यात आले होते.ह्यावेळी पंचवीस मुलांनी ह्या शिबिरात सहभागी होऊन शिबिर यशस्वी पूर्ण केले.ही शिबिरे यशस्वी करण्यात धम्मअनाकुला विपश्यना केंद्र खापरखेडाच्या आयोजक टीमच्या नियोजनाचा खरा परीपाक होय. त्याकरिता नांदुरा येथील विपश्यी साधक  यांचेही परीश्रम फळास आले.त्यात विपश्यी साधकांच्या दानातुन यशस्वी झालेल्या ह्या शिबिरांचे लोक मुक्त कंठाने प्रशंसा करीत आहेत .

Powered by Blogger.