Breaking News
recent

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार

  


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवार, ११ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने गंभीर जखम झाली.

हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले. सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्त गाडी नंबर  (MH 34 6152) या गाडीत बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला. गोळी डाव्या हातावर लागली व.थोडी दुखापत झाली. गोळी झाडताच गाडी पसार झाली. ही घटना रात्री ९.३० वाजता घडली. गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने थोडक्यात बचावले. मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

Powered by Blogger.