अंतः अस्ति प्रारंभ! व्हाट्सअँपला स्टेटस लिहून राकेशने संपवललं जीवन..
मलकापूरः शहरातील गाडेगाव मंदीर | परिसरातील २३ वर्षीय युवकाचा घराच्या छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी ४ मे रोजी | सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. राकेश विनोद रायपुरे वय २३ वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरातील गाडेगाव हनुमान मंदिर | परिसरातील रहिवासी राकेश विनोद रायपुरे | वय २३ वर्ष हा आज सायंकाळच्या सुमारास छतावरून खाली पडल्याने मृतावस्थेत दिसून आला. राकेश हा घराच्या छतावरून खाली केली होती. मात्र नेमका छतावरून राकेश कसा पडला हे कुणालाच समजले नाही.
तर राकेशच्या शरीरावर विद्युत शॉक लागल्याचे चिन्ह दिसून आले. याबाबत मलकापूर शहर पोलिसांना कळविण्यात आले असून मृतदेह उपजिल्हा | पडल्याचे बघून स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी रुग्णालय येथे शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला आहे. याबाबत मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे नरेंद्र सिंह ठाकुर हे करीत आहे. राकेश ज्या घरावरून खाली पडला त्या घरासमोर महावितरणचे ११ केवी चे विद्युत प्रवाह वाहिनी असून त्याचा शॉक बसून राकेश खाली पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे मृतक राकेशने अंतः अस्ति प्रारंभः असे आपल्या वाट्स अॅपला स्टेटस लिहून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र राकेश चे असे जाण्याने परिसरात शोककळा पसरली होती