Breaking News
recent

लोकविद्यालय तुळसणीच्या १९९० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात



तब्बल ३३ वर्षांनंतर आले एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

 देवरूख:-* संगमेश्वर तालुक्यातील लोकविद्यालय तुळसणीचे सन १९९० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच नंदकुमार कदम यांच्या आंबव येथील फार्म हाऊस येथे पार पडला. या स्नेह मेळाव्याला मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण, देवरूख आदी भागातून सुमारे ३० जण माजी विद्यार्थी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र आले होते. यामध्ये बहुतांश हे शासकीय कर्मचारी, व्यवसायिक, शिक्षक आदी पदांवर कार्यरत आहेत या मेळाव्याच्या सुरुवातीला प्रत्येकाने आपला ३३ वर्षातील झालेल्या जीवन प्रवासातील अनुभव कथन केला. त्यांनतर  शाळेतील जुन्या आठवणींवर गप्पा-गोष्टी केल्या.  यावेळी आपल्या ग्रुपमधील काही देवाज्ञा झालेल्या सहकारी मित्रांना श्राद्धजली वाहिली.

Powered by Blogger.