Breaking News
recent

शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रकार समुपदेशनात उघड

 


 पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आाल्याची घटना समुपदेशानात उघडकीस आली आहे. शालेय समुपदेशनात अल्पवयीन मुलीने सामूहिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणात कोंढवा पाेलिसांनी एकास अटक केली असून साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

मुन्ना नदाफ (रा. येवलेवाडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी २०१८ ते १९ कालावधीत एका शाळेत सातवीत शिक्षण घेत होती. त्या वेळी ती घराशेजारी खेळत होती. शेजारी असलेल्या घराच्या खिडकीतून एक वस्तू खाली पडली. मुलगी घरात वस्तू देण्यासाठी गेली. तेव्हा आरोपी मुन्नाने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याने मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक यंत्रणा सुरू केली.

त्या वेळी मुन्नाच्या घरात आणखी दोघे जण होते. त्यांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी मुलीला देण्यात आली. शालेय समूपदेशनात अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

Powered by Blogger.