मिलिंद आळणे आणि प्रतिक्षा सूर्यवंशी यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न
वसमत :
मिलिंद आळणे आणि प्रतीक्षा सूर्यवंशी यांना पुणे येथील साऊ ज्योती फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देण्यात आला आहे .राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सामाजिक न्याय विभागात काम करणारे समतादूत मिलिंद आळणे आणि प्रतीक्षा सूर्यवंशी यांनी शौर्य प्रॅक्टिस अभ्यास नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेमध्ये यांच्या विद्यार्थ्यांना गणिताचा जादूगार यांना दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ सभागृहात संपन्न झाला आहे .
या सोहळ्यात समतादूत मिलिंद आळणे प्रतीक्षा सूर्यवंशी यांना मानाचा फेटा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांनी सांगितले की मिलिंद आळणे आणि प्रतीक्षा सूर्यवंशी हे उत्कृष्ट काम करतात असे या कार्यक्रमात केले आहे कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे चित्रा दीक्षित बॉलीवूड अभिनेत्री, बाळराजे वाघुळकर ,अभिनेता जी टीव्ही स्टार प्रवाह हिमांशू जैन, आंतरराष्ट्रीय अशियन सुवर्णपदक विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार यांच्या हस्ते सोळा संपन्न झाला. यांना मिळालेल्या राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे हिंगोली जिल्हा व परिसरात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.