Breaking News
recent

नांदेड अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या-बिपीन अण्णासाहेब कटारे

 


प्रतिनिधी( राजेंद्र सूर्यवंशी)

                                    ‼️नाशिक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे भव्य निदर्शने‼️

नाशिक:- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने  राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशानुसार दि.7 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर अक्षय भालेरावला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून जातीयवादी गावगुंडांनी भिमसैनिक अक्षय भालेराव याचा हत्याकांड केलाव त्याच्या कुटुंबियांवर देखील हल्ला केला. ह्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे.त्याच अनुषंगाने,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे देखील पक्षाच्या वतीने निदर्शना द्वारे नाशिक अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार व नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करतांना युवा नेतृत्व बिपीन अण्णासाहेब कटारे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव अँड.विजय पवार,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल,उत्तर महा.नेते मनोहर अण्णा दोंदे,नाशिक महिला शहराध्यक्षा रेश्माताई बच्छाव,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सिंग चितोडीया, नाशिक महानगर संघटक सागर जाधव,महानगर प्रमुख महिला आघाडी मीनाक्षी ताई पवार,जिल्हा नेते दिलीप प्रधान,दिंडोरी युवा नेते राहुल शार्दूल,पंचवटी अध्यक्ष युवा आघाडी हेमंत भाऊ आहेर,नाशिकरोड आकाश जी गांगुर्डे,राहुल गांगुर्डे,सुमित साळवे,राहुल ललवाणी,आदी पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते

Powered by Blogger.