श्रीरामपूरमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
श्रीरामपूर : (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )
आरक्षणाचे जनक , लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांची जयंती श्रीरामपूर मध्यमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील रेल्वेस्टेशन जवळील डॉ. आंबेडकरस्मारकाजवळ आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगीप्रथमत : फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एस.के. चौदंते व अशोकरावजाधव यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित अभिवादनसभेत एस के चोंदते यांनी आपले विचार मांडताना सांगितले की , सनातनी विचारांना न जुमानता शाहूमहाराजांनी बहुजन समाजालासामाजिक न्याय मिळून देण्याचे महान कार्य केले वआपल्या राज्यात प्रथमतःआरक्षण लागू करून त्यांनीसामाजिक परिवर्तनाला दिशा दिली. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.
याप्रसंगी श्रीरामपूर व परिसरातील समतावादी विविधपक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन करूनआपले विचार व्यक्त केले .याप्रसंगी अशोकराव जाधव , पी. एस. निकम , एम एस गायकवाड , एल एन म्हस्के चंद्रकांत खरात , सुनिल मगरअशोक बागुल , नानासाहेब शिंदे , सी. एस. बनकर , रविंद्र गायकवाड , रितेश एडके , शिवाजी गांगुर्डे , यु.एस. पंडित,राजु खरात , लेविन भोसलेसंतोष मोकळ , अशोक भास्कर दिवे , डॉ. अशोक शेळके , बाळासाहेब विघे,फिलिप पंडित , जनाभाऊखाजेकर , प्रदिप गायकवाड ,अँड प्रमोद आवारे , संजय कांबळे , सिताराम जाधव ,सुनिल ब्राम्हणे , योगेश ससाणे,सचिन भालेराव , आकाश शेंडे,एकनाथ पवार , विठ्ठल गालफाडे , वसंतराव साळवे ,श्रावण भोसले , गोरख राऊत , तुकाराम शेळके आदी सह विविध पक्ष व संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. निकम यांनीकेले. कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शाहू महाराजस्मृति शताब्दी समिती यांनीकेले होते.