दे.माळी येथे पांडुरंग संस्थान आयोजित भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न.
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
श्री पांडुरंग संस्थान देऊळगाव माळी तालुका मेहकर यांच्या वतीने आषाढी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग संस्थांच्या मंगल कार्यालय येथे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत रोग निदान व औषध वाटप शिबिर दिनांक 15 जूनला ला संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटक म्हणून सरपंच किशोर गाभणे यांची उपस्थिती लाभली.या शिबिरामध्ये डॉ.धनंजय सातपुते अस्थिरोग तज्ञ, डॉ,अनंता मगर जनरल सर्जन मगर (हॉस्पिटल बुलढाणा), डॉ.आशिष वणारे बालरोग तज्ञ, डॉ.अरुण गिऱ्हे एम एस सर्जन नेत्ररोग तज्ञ (नवोदय हॉस्पिटल सा.खेर्डा), डॉ. विनायक मगर हृदय रोग तज्ञ, (मगर हॉस्पिटल मेहकर), डॉ. निलेश ठाकरे स्त्री रोग तज्ञ, डॉ.शितल ठाकरे स्त्री रोग तज्ञ, डॉ.बिपिन पागोरे दंत रोग तज्ञ, डॉ.राम जमधाडे रिचार्ज महा लॅब लघवी रक्ती तपासणी तज्ञ, या तज्ञ डॉक्टरांकडून शेकडो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्याचबरोबर देऊळगाव माळी येथील सर्व डॉक्टर मंडळींचे, तसेच सर्व फार्मासिस्ट यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले. भव्य असे शिबिर यशस्वीतेसाठी पांडुरंग संस्थानचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. या शिबिरासाठी अशोक मगर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) डॉ. डी.व्ही.सुरूशे, डॉ.बद्री मगर, डॉ. मधुसूदन राऊत, व सर्व डॉक्टर असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले.