Breaking News
recent

बंजारा समाजाचे आराध्य दैवत आदिशक्ती जगदंबा माता,संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी तीर्थक्षेत्र पोहरादेवी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौऱ्याची सुरुवात



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

आज दि.९ जुलै रोजी गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन आदिशक्ती जगदंबा मातेचे,संत सेवालाल महाराज,संत रामराव बापू,संत बामनलाल महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं.यावेळी गोर बंजारा धर्मपिठाधीश्वर प.पु बाबूसिंग महाराज,गादीश्वर धर्मगुरू महंत प.पु.कबीरदास महाराज,प.पु.धर्मगुरू महंत रायसिंग महाराज, प.पु.धर्मगुरू महंत सुनील महाराज,प.पु. धर्मगुरू महंत शेखर महाराज यांनी उद्धव साहेबांचे स्वागत व सन्मान केला भरभरूनआशीर्वाद दिला.यानंतर प.पु.रामराव बापू यांच्या आशीर्वादाने भगवंतसेवक किसन भाऊ राठोड निर्मित गोरबंजारा धर्मपीठ भक्तीधाम येथे उद्धव साहेब यांनी भेट दिली.

     सर्व देवी देवतांचे  दर्शन घेत धर्मपिठाचे दर्शन घेतले.यावेळी संत हमूलाल महाराज दरबारामध्येआरती व पूजा करून धर्मपीठावर धर्मपीठाचे धर्मगुरू महंत प.पु.जितेंद्र महाराज यांनी बंजारा संस्कृतीनुसार कवलपट्टा वस्त्र देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान केला.यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक नेते मा अनिल गजाधर राठोड ,मा संजय देशमुख ,सुधीर कवर,रवी पवार ,भोला राठोड, विरू राठोड सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.यावेळी धर्मपीठ भक्तीधाम परिसरामध्ये सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यातआलं होते उद्धव साहेबांच्या दौऱ्यामुळे बंजारा समाजामध्ये उत्साहाच वातावरण असून,सर्व तीर्थस्थळांना भेटी दिल्यामुळे मी भारावून गेलेलो आहे,असे उदगार उद्धव साहेब यांनी काढले.मला पोहरादेवीला यायची खूप दिवसापासून इच्छा होती.पोहरादेवीच्या विकासाचाआराखडा माझ्याच काळामध्ये मी पुढे नेलेलाआहे याचा मला आनंद आहे असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वाईगौळ येथे अनिल गजाधर राठोड यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले या वेळी असंख्य शिवसेनिक हजर होते .त्या  नंतर महेश बाजार समिती,मानोरा रोड, दिग्रस येथे मा पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता संवाद दिग्रस येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात वाशिम यवतमाळ मतदारसंगातील शिवसैनिकाशी त्यांनी संवाद साधतांना भाज्यपाच्या कार्य शैलीवर जळजळीत टीका करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून लोकाची घरे फोडण्यात भाजप व्यस्त असल्याचा आरोप केला. 

    भाजपला ठाकरे नको मात्र शिवसेना हवी होती ते फोडण्याचे काम भाजपणी केले भाजपच्या दलालानी ज्याच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेऊन शुद्ध केले असल्याची टीका शिवसेना प्रमुखांनी केली. कापसाच्या गाड्या अडवून 200 रुपये मंगणाऱ्या माणसाला मी आमदार केले तरीही मला सोडून गेले ते पूर्वी गाड्या अडवून 200 रुपये हप्ता ,वसूली करत होते हे मला माहीत नव्हते नाही तर मी त्यांना पुढे जाण्याची संधी दिलीच नसती या मतदार सगातील खासदार वर भस्ताचारचे आरोप केले त्यांना जेल मध्ये टाकायच्या गोसती झाल्या आणि त्याच खासदाराने पंतप्रधाना ला राखी बाधली अश्या प्रकारची भूमिका भाजपने स्वीकारली आहे. शिवसेना फोडली ते काय कमी होत म्हणून आता राष्ट्रवादी पक्ष फोडली . ही जाहीर सभा नसून कार्यकर्ता संवाद मेळावा आहे पण मी या मतदार संघात पुन्हा जाहीर सभा घेणार असे ते मनाले.

Powered by Blogger.