Breaking News
recent

पानशेत पूरग्रस्तांसाठी लहुजी आर्मीची जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने



बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी #लहुजी आर्मी च्या वतीने पानशेत पूरग्रस्त मागासवर्गीय सहकारी संस्थेमधील मातंग समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 12 जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटून अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले होते त्यामध्ये मुख्यत्व करून नदीच्या लगत असलेले नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. यामध्ये मातंग समाज वास्तव्यास असल्यामुळे सर्वाधिक पूरग्रस्त या समाजातील होते. यांचे पुनर्वसन सहकार नगर पद्मावती या भागात करण्यात आले होते. परंतु 63 वर्षे होऊ नये  मागासवर्गीय सोसायटींचे प्रश्न जैसे थे असल्याने त्याच्या निषेधार्थ पानशेत पूरग्रस्त वारसांचा निदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. 

यावेळी लहुजी अर्मीच्यावतीने पानशेत  पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांची नोंदी करण्यात यावी. मागासवर्गीय सहकारी संस्था मधील अनुसूचित जातीच्या सभासदांच्या जागेवर अनधिकृत ठेवण्यात आलेला ताबा तत्काळ कार्यवाही  करावी, मागासवर्गीय सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्याकडे अनधिकृत ताबा आहे तसेच पुणे शहर व जिल्हामध्ये जमिनी, फ्लॅट, बंगला, फॉर्म हाउस आणि दुकाने आहेत अशांवर कार्यवाही करण्यात यावी. सहकारनगर मधील बापुजीनगर सहकारी पुनर्वसन गृहरचना संस्था मर्यादित मधील अनेक अनुसूचित जातीचे आणि सभासद नसताना मालमत्ता पत्रकावर नाव नोंद केली आहेत. अशा बिगर सभासदांनी अनुसूचित जातीच्या जमिनी लाटल्या बद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. अशा अनेक मागण्याचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. 

याबाबत संघटनेचे अध्यक्ष अंबादास सुर्यवंशी म्हणाले की, “आज #पानशेत #धरण फुटून ६३ वर्ष झाली. या घटनेत मुख्यत्व करून  जो नदी लागताच राहणारा समूह होता त्यामध्ये सर्वाधिक #मातंग_समाज आहे. अशा पानशेत पूरग्रस्तांचे आजपर्यंत प्रश्न जैसे थे असून न्यायासाठी आजही त्यांना रत्यावर येऊन संघर्ष करावा हे #भारतीय_संविधान, राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे अपयश आहे. याचा आम्ही निषेध करतो. शासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाहीतर लहूजी आर्मीच्या वतीने सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल

Powered by Blogger.