विद्युत तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तत्काळ तोडण्यात याव्या- युवा सेना उपशहर प्रमुख अनिल जावरे यांची मागणी
चिखली:- पावसाला सुरुवात झाली असून चिखली शहरातील तसेच पारधीबाबा मंदिर परिसरातील, जिनिंग प्रेसिंग परिसरातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या विद्युत तारांमध्ये अडकून बीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते तसेच सदर फांद्या वादळी वाऱ्याच्या संपर्कात येऊन स्पार्किंग होऊन मोठी दुर्घटना देखील होऊ शकते आणि सदर फांद्या तुटून अपघात देखील होऊ शकतो या सर्व बाबींचा धोका लक्षात घेऊन अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या तत्काळ तोडण्यात याव्या अशी मागणी युवा सेना उप शहर प्रमुख अनिल जावरे यांनी केली यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्रिराम झोरे , शिवसेना उपशहर प्रमुख रवि पेटकर, समाधान जाधव युवा सेना उपशहर प्रमुख शंभु गाडेकर, युवा सेना उपशहर प्रमुख पवन चिंचोले, सनी जमदडे उपस्तिथ होते