पालघर जिल्ह्यातील आदिवासी कोकणा , कोकणी व कुकना जमातीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न.
आदिवासी कोकणा, कोकणी व कुकना समाजाच्या पालघर जिल्हा कमिटीच्यावतीने दी. 2/7/2023 रोजी मोखाडा येथील पतपेढी हॉल येथे 10 वी. , 12 वी. टॉप टेन गुणवंत विद्यार्थी व नीट कॉलिफाय केलेले विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचा उद्देश हा
आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व पुढील वाटचालीसाठी त्यांना योग्य ती नवी दिशा मिळावी , तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना समाजातील ज्येष्ठ समाज बांधव व उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी यांचे मार्गदर्शन व त्यांच्या अनुभवातून प्रेरणा मिळावी, तसेच आपल्या समाजाकडून त्यांचे कौतुक व सन्मान केल्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो, हि भावना त्यांच्यात निर्माण व्हावी तसेच समाज उत्कर्षासाठी प्रत्येक समाज बांधवांचा हातभार व सहयोग मिळावा आणि त्यांच्यात भविष्यात समाजाविषयी बांधिलकी निर्माण व्हावी हा उद्देश ठेऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला करणेत आला होता.
सदर कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, वाडा, वसई व तलासरी या तालुक्यातील निवड केलेले गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले होते. तर सत्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करणेसाठी कोकणा समाजातील उच्च पदांवर काम करणारे अधिकारी सन्मानित सुरेंद्र टोपले सर, डॉ. दत्तात्रय शिंदे सर, प्राध्यापक वसंत भसरा सर, प्रा.सुनील भुसारा सर, तसेच श्री. अनिल भरसट साहेब यांची उपस्थिती महत्वाची ठरली त्यांनी आपले शिक्षणातील अनुभव कथन करुन विद्यार्थ्यांचे मनोबल व पुढील शिक्षणातील हिम्मत वाढविली.
तसेच आजच्या कार्यक्रमात आपल्या समाजातील ज्येष्ठ समाज बांधवांची उपस्थिती कमालीची होती, त्यांचे समाज कार्यातील अनुभव आणि समाजा विषयीची तळमळ सतत जाणवत होती. (सन्मा. विष्णू चौधरी साहेब, बोरसे सर, राहुल धूम साहेब, गावित पी. एस.आय., सदाशिव राऊत साहेब, काशिनाथ भोये साहेब, डॉ.सदाशिव पवार साहेब, कुवरे साहेब, अवतार साहेब, बिपिन जाधव साहेब , गवळी सर ) हेच खरे कोकणा समाजाचे समाज संघटनेचे प्रवर्तक आहेत.
सदर गुणगौरव कार्यक्रमात आपल्या समाजातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर सन्मानित श्रीमती. भुसरा मॅडम , श्री. कमलाकर धूम साहेब तसेच हिरवा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भुसारे साहेब उपस्थित होते. श्री. कमलाकर धूम साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. कुणाल भुसारे साहेब यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडले . शेवटी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पालघर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष मा. संदीप साठे सर , यांचे महत्वाचे योगदान व मार्गदर्शन होते. तसेच पालघर जिल्हा कार्यकारणी मधील खजिनदार श्री. योगेश भोये साहेब यांचे प्रत्येक ठिकाणी आपला वेळ आणि आपली मेहनत लावली होती. सोबतच सदर कार्यक्रम चांगला पार पडावा म्हणून केंद्रीय कोर कामिटीचे सद्यस्य मा. प्रभाकर भुसारे व त्यांची तालुका कमिटीची महत्वाचे योगदान होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा म्हणून पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कमिटीमधील अध्यक्ष, सचिव , खजिनदार व सदस्य यांचा महत्वाचा सहभाग आहे, जसे हाताच्या प्रत्येक बोटाचे कार्य महत्वाचे असते तसेच प्रत्येक सदस्याचा कार्यक्रमातील कामात हिस्सा होता.
आपल्या आदिवासी कोकणा समाजातील आज उपस्थित गुणवंत विद्यार्थी हे आपल्या पूर्वजांनी जतन केलेली संस्कृतीचा सांभाळ करतील, जल, जगल व जमिनीचे संरक्षण करतील व या देशातील आपला आदिवासी समाज सर्वदृष्ठ्या सक्षम होईल यासाठी ते सतत प्रयत्न करतील याची मला खात्री आहे.