गोपाळपूर येथे गोपाळकाल्याने आषाढी एकादशी ची सांगता , वारकरी भक्तांना प्रेमाचा निरोप
आषाढी एकादशीची सांगता म्हणून वारकरी भक्तगण परतीच्या प्रवासाला लागतात.व आजच्या दिवशी गोपाळपूर येथे संत जनाबाई मंदिरामध्ये गोपाळकाला साजरा होतो.सर्व संतांच्या पालख्या सकाळी 6 वाजल्यापासुन ते 11 वाजेपर्यंत संत जनाबाईच्या भेटीसाठी म्हणून गोपाळपूर येथे दाखल होतात. लाह्या, दही, तसेच अनेक प्रकारचे पदार्थ मिसळुन जो पदार्थ बनतो त्याला काला म्हटले जाते. आणि सर्व वारकरी भक्तांनी तो मिळून खाणे याला गोपाळकाला म्हणतात.
गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला म्हणत सर्व संताच्या पालख्या व वारकरी भक्त आज परतीच्या मार्गावर जातात. पुरातन काळात देव देवता जे खेळ गोपाळकाल्याला खेळायचे ते खेळही या ठिकाणी आजही खेळले जातात.गोपाळकाल्याचे आजचे महत्व काय असते ते गोपाळपूर येथील दिलीप गुरव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले .