राजूर घाटातील 'त्या' गँगरेप प्रकरणातील ५ आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी :दोघांची बालसुधारगृहात रवानगी
मोताळा ■ महाराष्ट्रभर गाजलेल्या राजूर घाटातील गँगरेप प्रकरणाला पिडीत महिलेने अत्याचार झाला नसल्याचे बयाण दिल्याने वेगळे वळण मिळाले असून सदर प्रकार लुटमारीचा निघाला. या प्रकरणातील ७ आरोपींना बोराखेडी पोलिसांनी अटक केली होती, त्यांना १५ जुलै रोजी मोताळा न्यायालयात हजर केले असता ५ आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी तर दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठविणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्यावतीने देण्यात आली.
बुलढाणा मलकापूर रोडवरील राजूर घाटात १३ जुलै रोजी एका महिलेवर सामुहिक अत्याचार तसेच फिर्यादीला मारहाण करुन ४५ हजार रुपये लुटल्याची फिर्याद पिडीतेच्या नातेवाईकाने बोराखेडी पोस्टे. दिली होती. सामुहिक अत्याचाराचे प्रकरण असल्याने संपूर्ण राज्यभर गाजले होते. परंतु पिडीत महिलेने १४ जुलै रोजी
जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष अत्याचार- झाल्याचा कुठलाही प्रकार घडला नसल्याने वैद्यकीय तपासणी केली नसल्याने सदर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. सदर प्रकरण लुटमारीचे असल्याने या प्रकरणातील ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना १५ जुलै रोजी बोराखेडी पोलिसांनी आरोपी राहुल रमेश राठोड (वय २५) रा. मोहेगांव, मंगेश मल्हारी मोरे (वय २३), काजू रमेश राठोड (वय २७) रा. मोहेगांव, विजय उर्फ दुन्या मधुकर बरडे (वर्ष की १९) रा. डोंगरखंडाळा, किसन उर्फ श्रीराम बरडे (वय २१) रा. डोंगरखंडाळा यांना मोताळा न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. तर दोन आरोपी अल्वपयीन असल्याने त्यांची बुलढाणा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
*अत्याचार झाला नाही नाही-पिडीता*
पिडीत महिलेने अत्याचार झाला नसल्याचे बयाण देवून वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही, असे सांगून तपासणी करण्यास नकार दिला होता, त्यांनी मोताळा येथील न्यायालयामधे सुद्धा अश्याच प्रकारचे बयान दिल्यामुळे या प्रकरणी नविन पेच निर्माण झाला आहे. !