Breaking News
recent

रोवळे येथील खोंडखोल आदिवाशीवाडी स्थलांतरीत बांधवांना जीवनावशक्य वस्तुंचे वाटप.



तळा.    रायगड जिल्ह्यातील अतिवष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी राहण्याची सोय तसेच आरोग्यतपासणी करून त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय केली. 

रोवळे आदिवाशीवाडी खोंडखोल येथील दरडग्रस्थांचे स्तलांतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रोवळा येथे करण्यात आले असुन स्थलांतरीत केलेल्या सर्व नागरिकांना लागणारी जिवनावशक्य वस्तुंचे वाटप रायगडचे खाजदार सुनील तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे, विधानपरीषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्यातून करण्यात आले. आमदार अनिकेत तटकरे यांनी तळा तालुक्यातील दरडग्रस्थ ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सुरक्षित घरांचा प्रश्न विधीमंडळात मांडून त्यासाठी विषेश प्रयत्न करू असे आश्वासन सर्व दरडग्रस्थ भागातील नागरिकांना देण्यात आले.


Powered by Blogger.