दिव्यांगांना ५℅ निधी त्वरीत वाटप न केल्यास दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चा आंदोलनाचा ईशारा
मलकापूर: दिव्यांगांना राखीव असलेला ५ टक्के निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा मलकापूर नगर परिषदे समोर एकदिवशीय आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद,नगर पंचायतींना दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवून खर्च करण्याचे आदेश आहे,मात्र नगर परिषदने दिव्यांगांसारठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप पर्यंत वितरीत केलेला नाही.तसेच सदरचा निधी ३℅ असताना २००० रू प्रत्येकी वाटप करण्यात येत होते मात्र आता मर्यादा वाढून ५℅ करण्यात आली असून सुद्धा २००० रू च वाटप कोणत्या आधारे करण्यात येते याबबात न प ने खुलासा केलेला नाही दिव्यांगंच्या हक्काचा निधी तातडीने वितरण न झाल्यास दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरच्या वतीने एकदिवसीय आंदोलनकरण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी दिव्यांग बांधव उपस्थित होते