Breaking News
recent

संग्रामपूर तालुक्यात डोळ्यांची साथ डीएचओ व साथरोग अधिकाऱ्यांची प्रा. आ. केंद्राला भेट



सोनाळा ■ अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे संग्रामपूर तालुक्यात डोळ्यांच्या साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात गावोगावी ७०० रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. परिणामी मंगळवार २५ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी पातुर्डा व सोनाळा प्रा. आ. केंद्राला व बावनबीर उपकेंद्राला भेट देवून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी कर्तव्यदक्ष संग्रामपूर तालुका अधिकारी डॉ. चंद्रशेखर मारोडे यांनी तालुक्यातील आरोग्य विभागाचे सादरीकरण केले. 

`अतिवृष्टी झालेल्या गावांसाठी आपदग्रस्त नागरिकांसाठी १२ आरोग्य पथके घरोघरी जावून तपासणी करण्यात येत आहे. पातुर्डा, बावनबीर, सोनाळा येथे डोळ्यांच्या साथीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यासाठी आढावा घेण्यात आला आहे. सोनाळा प्रा. आ. केंद्राला भेटी दरम्यान येथील सर्वच डॉक्टर प्रभारी आहेत. नविन पूर्णवेळ डॉक्टर देण्यासाठी प्रयत्न सरु असल्याचे सांगितले. सर्वच प्रा. आ. केंद्र व उपकेंद्रात डोळ्याचा ड्रॉप व औषधी उपलब्ध आहे. स्वतः डॉ. गिते यांनी काही रुग्णांची तपासणी केली. अनेक पदे रिक्त असतांना सातपुड्याच्या या प्रा. आ. केंद्रात विपरीत परिस्थितीत अनेक प्रभार सांभाळणाऱ्या सोनाळा प्रा. आ. केंद्र येथे कार्यरत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, रुग्णवाहिका चालक, प्रभारी वैधकिय अधिकारी हे आरोग्य सेवा देत आहेत. डॉ. गिते यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


Powered by Blogger.