Breaking News
recent

संग्रामपूर तालुक्यात कोसळधार; केदार नदीला पूर, काही गावांचा संपर्क तुटला



 बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुळे संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिणामी बावनबीर, टूनकी गावांचा संपर्क तुटला असतानाच घरात पाणी घुसले आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून हजेरी लावली.

संग्रामपूर तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु असून केदार नदीला पूर आला आहे.बावणबीर गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले, गाव जलमय झाले असून गावाला नदीचे स्वरूप आले आहे. नागरिकानी उंच भागावर आसरा घेतला आहे. सोनाळा नजीकच्या लेंडी नाल्याला पूर आल्याचे सूत्रांनी सांगितले.


Powered by Blogger.