अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे भारतीय स्टेट बँकेच्या (कृषी) शाखेमध्ये शेतकऱ्यांना होतो नाहक त्रास....!-अक्षय पाटील यांची बँक मॅनेजर कडे कर्मचारी वाढवण्याची मागणी.
जळगाव जा.:- भारतीय स्टेट ऑफ इंडिया (कृषी) शाखेमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील अंदाजे ३० गावाचा समावेश असुन या शाखेमध्ये शेतकरी खातेदार मोठ्या प्रमाणावर आहे. गेली काही दिवसांपासून या शाखेमध्ये सहाय्यक शाखा व्यवस्थापक व लिपिक पदाच्या जागा रिक्त आहेत. हे रिक्त असलेले पदे भरावी त्यामुळे बाकी इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पोहोचत आहे. अशी मागणी बँक मॅनेजर यांनी सुद्धा त्यांच्या वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केला तरीही कर्मचारी मिळाले नाही असे बँक मॅनेजर यांनी सांगितले.
यामुळे खातेधारक शेतकऱ्यांना कमी कर्मचारी असल्यामुळे खूप मोठा नाहकत्रास सहन करावा लागत आहे.सध्या परिस्थितीला जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी मुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानीचा मोबदला पी एम किसान चे पैसे चेक करण्याकरता तालुक्यातील शेतकरी बँकांचामध्ये चकरा मारत आहे. काही कर्मचारी लोकांची गर्दी पाहता उडवाउडवीची उत्तरे देतात थोड्या लहान मोठ्या कामांसाठी दोन-दोन वेळा बोलावतात याचा शेतकऱ्यांना हा त्रास होतो.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आमच्या शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर हे आम्ही खपवुन घेणार नाही. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखेमध्ये रिक्त असलेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावी. अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी बँक मॅनेजर यांच्याकडे लावून धरली यावेळी वैभव जाणे, विठ्ठल पाटील तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.