मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजी माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान
शिवशंकर मगर मेहकर तालुका
19ऑगस्ट शनिवार ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश अभियाना अंतगर्त देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर संकल्पना व कार्यक्रमाचे आयोजन श्री सारंग माळेकर व मित्रमंडळ यांच्या कडून करण्यात आले होतेया वेळी मेहकर तालुक्यातील जवळपास सर्व आजी-माजी सैनिक सहपरीवार हजर होते तसेच शहीद राजू गायकवाड यांच्या आई आसराबाई गायकवाड यांना सौ. निता सारंग माळेकर यांनी साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. वसंतराव गिरी सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तदनंतर ॲड.सरदार साहेब यांनी सुद्धा माजी सैनिकांचे अडचणी आणि त्यांना आलेले अनुभव तसेच देश सीमेवर आलेले प्रसंग सर्वांसमोर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष श्री डॉ. गणेश मांटे साहेब आणि हिंदू राष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष श्री विजय भाऊ पवार यांचा सत्कार सारंग माळेकर यांच्या हस्ते करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री अर्जुनराव वानखेडे यांनी भूषवले तसेच या कार्यक्रम प्रसंगी ॲड. प्रकाश गवई डॉ. संजय लोहिया, डॉ. प्रशांत राठोड, श्री सुनील शेवाळे, डॉ. सुभाष लोहिया, माधवराव बजाड, गजानन घुले, भानुदास पवार, अश्राबाई गायकवाड, मुरार सर, शिवशंकर मगर, अशोकराव आडेलकर, शितारामजी ठोकळ महाराज, प्रमोद काळे, गजानन वानखेडे, पार्वती ताई कान्हे, चित्रलेखा ताई पुरी, कमलताई गायकवाड, सतीश मवाळ, राजू निकम, राजू नवले, आशिष देशपांडे, ॲड. रजनीकांत कांबळे, सुभाष नरवाडे, चंदन अडेलकर, अमोल मिरे, पिंटू गवते तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्य पत्रकार बंधूंची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सारंग प्रकाश माळेकर व मित्र मंडळ यांनी केले तसेच चणखोरे कॉलनीतील सर्व मंडळींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पऱ्हाड व विनोद बोरे यांनी केले आभार प्रदर्शन शिवशंकर मगर यांनी केले.