भोला राठोड शिवसेना(उबाठा) पुसद संपर्कप्रमुख पदी निवड..
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत, विश्वासू व जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे तसेच सामाजिक कार्यातून लोकप्रिय झालेले श्री भोला राठोड शिवसेना संपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाशिम मधील मानोरा
तालुक्यातील मूळ गाव वाईगौळ येथील व संत सेवादास महाराज यांचे सातवे वंशज सध्या मुंबई येथे रहवासी आहेत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्याची ओळख आहे.
मा.शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची कार्याची दखल घेत शिवसेना संपर्कप्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पदावर त्याची नियुक्ती केली प्रथम कारंजा मांनोरा मतदारसंघ ,त्यानंतर काटोल, नागपूर मतदारसंघात व गोदीया या मतदारसंघात संपर्कप्रमुख मनून खूप चांगल्या प्रकारे कामे केली आहेत. त्यांच्या कामामुळे आता नवनियुक्त पुसद विधानसभा संपर्कप्रमुख करण्यात आली आहे.
मांनोरा तालुक्यातील जि. प निवडणूक पासून त्यांच्या राजकीय कार्याला सुरुवात झाली. राजकीय क्षेत्रात खूप कमी वयात त्यांनी चांगली कामे केली आहे या तालुक्यात त्यांची चांगलीच पकड आहे. शेतकरी,मंजुरवर्ग,विद्यार्थी, इत्यादि अनेक लोकावर त्यांच्या कामामुळे त्यांची वेगळीच ओळख आहे. सुख दुखात मदत करणे किवा लोकांच्या समस्या सोडवण्यात सदाही तत्पत असतात. त्यामुळे जिल्ह्यात निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आदरणीय शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्या वर टाकलेला विश्वास व पुसद विधानसभा संपर्कप्रमुख पद देऊन काम करण्याची दिलेली संधी पक्ष वाडीसाठी काम करणार आणि गोर गरिबांचा सेवेत आपण अर्पण करू मिळालेल्या पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण व पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करिन तसेच आपण पुसद विधानसभा संपर्कप्रमुख पदावरून पक्षला बळकट करून संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करेल. -भोला राठोड पुसद विधानसभा संपर्कप्रमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)