Breaking News
recent

आवाळे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात बेमुदत धरणे आंदोलन



                                संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी

शहापूर तालुक्यातील आवाळे ग्रामपंचायत मध्ये पेसा व १५ वा वित्त आयोग निधीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचारा प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका कमिटी आणि आवाळे ग्रामस्थ यांनी ७ ऑगस्ट रोजी शहापूर पंचायत समितीच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

      आवाळे ग्रामपंचायत मध्ये सन २०१६ ते २०२१ या कालावधीमध्ये ५% पेसा निधी व १५ वा वित्त आयोग निधी मध्ये भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका कमिटीच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पंचायत समिती शहापूर येथे मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे यशस्वी चर्चेनंतर पंचायत समितीने गठीत केलेल्या समितीने दिलेल्या अहवालात ग्रामपंचायतीचे सामान्य कॅशबुक मध्ये भरपूर तफावत दिसून आली होती. त्यानंतर सुद्धा संबंधितांवर कुठलीच कारवाई न झाल्याने कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देखील या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. ८ महिने उलटले तरीही कुठलीच कारवाई होत नसल्याने ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका कमिटी व आवाळे ग्रामस्थ या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून गुन्हे नोंद करावेत या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे त्याचबरोबर फेडरेशनचे अध्यक्ष नितीन काकरा, सचिव मनोज काकवा, सदस्य शाम निखडा, रशीद शेख, आवाळे ग्रामपंचायतीचे सजग नागरिक, सुनिल आगिवले, बाबू भोकरे, गुरुनाथ पोकळा, अनंत ठाकरे, कृष्णा करपडे आदींनी देखील सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील जलजीवन मिशन संदर्भात चर्चा करणे, दहिगाव ग्रामपंचायत मधील तलवाडा शिसवली तुंबेपाडा आदी पांड्याना विद्युत लाईन टाकणे, दहिगाव ते बेलनाला रस्ता संदर्भात चर्चा करणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजने संदर्भात चर्चा करणे, ड घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे आदी मागण्या देखील धरणे आंदोलनात करण्यात आल्या आहेत.

Powered by Blogger.