राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक पदी श्री डॉ. श्याम जाधव (नाईक)
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे तसेच सामाजिक कार्यातून व आरोग्य क्षेत्रातून लोकप्रिय झालेले श्री डॉक्टर श्याम जाधव (नाईक) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक पदी श्री डॉक्टर श्याम जाधव (नाईक)यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे .पक्ष वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असा विश्वास माननीय प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला .यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे साहेब, संजयजी बोरगे साहेब,प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल तथा पश्चिम विदर्भ प्रभारी राजूभाऊ गुल्हाने व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित दादांनी माझ्या वर टाकलेला विश्वास व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक देऊन काम करण्याची दिलेली संधी गोर गरिबांचा सेवेत आपण अर्पण करू मिळालेल्या पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण व पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करिन तसेच आपण प्रदेश संघटक पदावरून पक्षला बळकट करून संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचा विस्तार करेल.याप्रसंगी आमदार इंद्रनील नाईक व चंद्रकांत दादा ठाकरे यांचे आभार मानले. -श्री डॉ.श्याम जाधव (नाईक) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक महाराष्ट्र