Breaking News
recent

भौतिक प्रगती बरोबर वैचारिक प्रगती होणे गरजेचे- सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

 उमरीगड:- भौतिक प्रगती बरोबर वैचारिक प्रगती होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन काल आमदार ऍडव्होकेट इंद्रनील नाईक यांच्या धर्मपत्नी सो मोहिनीताई नाईक यांनी उमरीगड येथे झालेल्या पायाभरणी कार्यक्रमात  केले. काल उमरीगड येथे 593 कोटी विकास आराखडा मधील 300 कोटी रूपयाच्या कामाचा पायाभरणी समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लोकप्रिय नेते माननीय संजयभाऊ राठोड जलसंधारण मंत्री महंत बाबुसिंग महाराज मंहत यशवंत महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, महंत रायसिंग महाराज, डॉ.टी.सी. राठोड, मान्यवर उपस्थित होते. सो मोहिनीताई इंद्रनील नाईक पुढे म्हणाल्या की, आदरणीय संजयभाऊ राठोड यांनी 593 कोटी विकास निधी आणून पोहरागड, उमरीगडाचा संपूर्ण विकास करण्याचे जे नियोजन केलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते.  संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज यांच्या पावन आशीर्वादाने संपूर्ण भारतभर नावलौकिक असलेल्या नाईक घराण्याची सून म्हणून मी गुजराती येथील के.जी .बंजाराची मुलगी नाईक घराण्यात आली  हे  मी माझे भाग्य समजते. भौतिक विकासाबरोबर वैचारिक विकास होणे आजच्या काळाची गरज असून संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज यांचे विचार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता अनमोल असून सामकीआईने सुद्धा महिलासाठी जे आदर्श विचार आपल्या समाजाला दिलेले आहे. त्या विचारानुसार आजच्या महिलांची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय प्रगती होण्याची सुद्धा आज मला गरज वाटते. महानायक वसंतराव नाईकसाहेब, जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब यांचे समाजासाठी फार मोठे योगदान असून आदरणीय संजयभाऊ राठोड यांनी पोहरागड उमरीगड विकास आराखडा साठी 593 कोटी रुपये आणून आज उमरीगडाच्या विकास कामाचे पायाभरणी शुभारंभ केल्यामुळे गोरबंजारा समाजमध्ये आंनदाचे वातावरण आहे. पोहरागड, उमरीगड विकास ही फार मोठी उपलब्ध मानावी लागेल. आपला गोरबंजारा समाज संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज, सामकी याडी यांना मानणारा असून त्यांच्या अनमोल विचाराने चालणारा समाज असल्यामुळे या तीर्थक्षेत्राचे विकास होणे फार गरजेचे होते आणि ते आदरणीय संजयभाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नाने होत असल्यामुळे आज बंजारा समाजामध्ये प्रसन्नतेचे वातावरण आहे. लोकप्रिय नेते आदरणीय मनोहरभाऊ नाईकसाहेब यांची सून म्हणून या ठिकाणी महंत यशवंत महाराज यांनी मला बोलावून माझा सन्मान केला. मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आणि थांबते. जय सेवालाल जय सामकी आई ! 

अगदी मोजक्या शब्दात सो मोहिनीताई नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. मा.संजयभाऊ राठोड यांचे आणि मंहत यशवंत महाराज यांचे भाषण रोखठोक आणि मुद्येसुद होते. कार्यक्रमाचे सुंदर संचालन प्रा. किशोर राठोड यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर श्याम जाधव यांनी केले. कार्यक्रम संपताच सगळीकडे सो मोहिनीताई नाईक यांच्याच भाषणाची सर्वत्र चर्चा होती.


Powered by Blogger.