Breaking News
recent

समृद्धी महामार्गावरील कामात मृत्यूचा तांडव


                                


                                 निर्माणाधीन पुलावरून गर्डर लॉंचर कोसळून १७ जणांचा बळी 

 ठाणे जिल्ह्याच्या शहापुर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाच बांधकाम सुरू असताना निर्माणाधिन पुलावरून गर्डर लॉंचर मशीन कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे.सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडलेल्या हृदयद्रावक मृत्यूच्या तांडवात १७ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मंगळवारी दुपारी १२ वाजता हाती आली.या दुर्घटनेत आणखी कामगार दडपले असल्याची भीती वर्तवली जात आहे.

        शहापुर तालुक्यातील सरलांबे खुटाडी गाव हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी जीवित हाणीची दुर्घटना घडलीय.रात्रीच्या दरम्यान पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी क्रेनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कार्यरत झाला होता.१३० फूट उंचीच्या पुलावर महाकाय क्रेनच्या सहाय्याने गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना समृद्धी महामार्गाने नेमलेल्या नवयुगा ठेका कंपनीचे अभियांत्रिकी आणि मजूर कर्मचारी कामाच्या ठिकाणी काम करत होते.सोमवारी रात्रीच्या शेवटच्या उरलेल्या मिनिटांमध्ये महाकाय क्रेन गर्डरसह खाली कोसळला अन् कर्मचाऱ्यांवर काळाची धडक देऊन गेला.या वेदनादायी दुर्घटनेने मृत्यूचा तांडव रात्रभर हाहाकार माजवत होता.

ओढवलेल्या काळाने कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवसाची सकाळ पाहायला मिळाली नाही.दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले.लागलीच फोनवर संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले.एनडीआरएफ पथक,आपत्ती व्यवस्थापन आणि जीवरक्षक टीमच्या सदस्यांच्या मदतीने गर्डर आणि क्रेनखाली अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.

१७ मृतदेह शहापुर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून ३ जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहे.आणखी ७ जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.घटनास्थळी दाखल झालेल्या मदत यंत्रणेकडून युद्धपातळीवर शोध कार्य सुरू ठेवण्यात आले आहे.घटनास्थळी कॅबिनेट मंत्री दादा भुसे,कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,माजी आमदार पांडुरंग बरोरा,तहसीलदार कोमल ठाकूर,शिवसेना मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश सचिव सत्यकाम पवार,ठाणे जिल्हा प्रमुख ज्योती गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत कार्य केले.दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Powered by Blogger.