Breaking News
recent

वाहन चालक व मालक यांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर सपन्न



संतोष आमले पनवेल  प्रतिनिधी 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यातर्फे सुधागड शैक्षणिक संकुल, कळंबोली, पनवेल येथे आज रविवार दिनांक 27/08/2023 रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पनवेल विभागातील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक व मालक यांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर व रस्ते अपघाताबद्दल  समुपदेशन शिबिर राबवण्यात आले.

           भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. वाहन चालकांचे शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य याच्या मधील गंभीर उनिवा ह्या  अपघाता पाठीमागील प्रमुख समस्या आहेत. भारतातील रस्ते अपघातांचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहन चालक कारणीभूत असतात. वाहन चालकांच्या वाहन चालवण्याच्या कौशल्यामध्ये वाहन चालकाच्या दृष्टीस व त्याच्या शारीरिक आरोग्यास अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक ही एक मोठी जबाबदारीची कामगिरी आहे. अशी कामगिरी पार पाडत असताना वाहन चालक, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ही बाब योग्य नाही. पनवेल मधील  विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक हे जबाबदारीने काम करतात. या जबाबदारीच्या जाणिवेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व वाहन चालकांची मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी हे शिबिर राबवले.

             महाराष्ट्र शासनाकडून या कार्यालयास या आर्थिक वर्षात, तज्ञ डॉक्टर्स कडून नेत्र तपासणी व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी, रस्ता सुरक्षा निधीतून या कार्यालयास रक्कम 5 लाख एवढे अनुदान प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल ला उपलब्ध झालेले आहे. 

             सदर नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आज रोजी 308 वाहन चालकांची नोंदणी झाली. 

             १) एकूण रक्त चाचणी 124 जणांनी केली पैकी १२ जणांना हाय शुगर तत्काळ सापडली व इतर तपासण्यासाठी सर्व जणांचे रक्ताचे नमुने सरकारी रुग्णालया मध्ये पाठवले आहे त्या सर्वांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. 

              २)एकूण डोळे तपासणी 145 जणाची झाली पैकी 129 जणांना दृष्टीदोष आढळले तसेच तीन जणांना गंभीर दोष आढळले.16 जणांचे डोळे चांगले आढळले. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे एकूण 15 जणांनी नेत्रदान चा फॉर्म भरलेला आहे.

               ३)एकूण डेंटल टेस्ट 60 घेतले गेल्या पैकी 30 जणांचे दोष आढळले. 

               ४)एकूण ईसीजी टेस्ट 170 जणांच्या केल्या पैकी 30 जणांना हृदयामध्ये दोष आढळले. 

             ज्या वाहन चालकांच्या डोळ्यांमध्ये दोष आढळला असून, त्यांना मोफत चष्मे तयार करून त्यांना  चष्मे वाटप करण्यात येणार आहे. या वाहन चालकापैकी तीन वाहन चालकाच्या डोळ्यांमध्ये गंभीर दोष आढळले व इतर दोष आढळलेल्या, त्यां  त्या चालकाना जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत उपचार करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

             श्री चंद्रकांत माने, मोटार वाहन निरीक्षक यांनी उपस्थित वाहनचालकांना अपघात टाळण्यासंदर्भात काय खबरदारी घ्यायची , याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री सचिन गोमसाळे, नेत्र शल्य चिकित्सक, यांनी उपस्थित वाहन चालकांना डोळ्याची काळजी कशी घ्यावयाची व डोळ्यातील गंभीर दोष वेळीच कसे ओळखायचे ? व त्यावर काय उपाय करावयाचे, याबद्दल  मार्गदर्शन केले. सौ. रत्नमाला पाबरेकर, कॅम्प व्यवस्थापक, सुश्रुषा हॉस्पिटल, पनवेल, यांनी हृदयाचे विकार वेळीच कसे ओळखायचे? याबद्दल मार्गदर्शन केले. व डॉ. जठार यांनी बीपी ,शुगर व शारीरिक स्वास्थ्य याच्याकडे दुर्लक्ष करू नका. असे वाहन चालकांना आवाहन केले. श्री गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन यांनी वाहन चालकांना आरोग्याची निगा कशी राखायची याबद्दल बद्दल मार्गदर्शन केले. 

            तसेच याप्रसंगी वाहन चालकांना त्यांचे डोळे, स्वतःच तपासता यावे, यासाठी एका माहितीपत्रकाचे अनावरण केले. सदर माहितीपत्रकामध्ये कलर ब्लाइंडनेस स्वतःच तपासता येतो.अक्षराच्या साईज वरून स्वतःलाच चष्म्याचा नंबर लागला की नाही हे तपासता येते.

             या कार्यक्रमास  डॉ. सचिन गोमसाळे , जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक रायगड- अलिबाग, डॉ. पांचाळ मधुकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल, डॉ.गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन, श्री पांडुरंग हुमणे, अध्यक्ष विद्यार्थी वाहक संस्था व श्री.नंदू बैकर, अध्यक्ष विद्यार्थी वाहतूक संघटना, सौ. पाब्रेकर, सुश्रुषा हॉस्पिटल, पनवेल  हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.अनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे होते. 

            हा कार्यक्रम राबवण्यासाठी श्री. सचिन विधाते, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व मोटर वाहन निरीक्षक श्री चंद्रकांत माने, श्री अजय कराळे, श्री संजय पाटील , तसेच सर्व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सौ विजया चामे मॅडम, श्री आशिष जयसिंगपूरे ,श्री रोहित पवार, श्री अशोक वारे, श्री विशाल सुपेकर, श्री जठार, यांचे सहकार्य लाभले.

            तसेच येत्या महिन्याभरात तीन ते चार ठिकाणी अशाच प्रकारचे शिबिर घेतले जाईल व याचा लाभ सर्व वाहन चालकांनी घ्यावा. असे आवाहन श्री अनिल पाटील यांनी केले. शेवटी सुधागड शैक्षणिक संकुल, यांनी या कार्यक्रमास हॉल व वर्गखोली व सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली, याबद्दल प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अनिल पाटील, यांनी त्यांचे आभार मानले.

Powered by Blogger.