वृद्धाश्रमाच्या मदतीला दात्यानी पुढे यावे
भरत जोगदंडे
श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे वृद्धाश्रमात धान्य दान
चिखली :- ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे बेघर निराधार वयोवृद्धाना सर्व प्रकारची सेवा मोफत देण्यात येते या वृद्धाश्रमाच्या कार्याची दखल घेत सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत असलेल्या श्री राम भक्त प्रतिष्ठान च्या वतीने वृद्धाची सेवा करन्यासाठी 2.50 क्विंटल गहू व 50 किलो तांदूळ हे धान्य तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दान देण्यात आले.
या वेळी कार्यक्रम चे अध्यक्ष सरपंच भरत जोगदंडे तर विशेष उपस्थितीत श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे सागर इटकर, ऋषिकेश सोनुने, श्याम साळवे, स्वप्नील मोरे, रवि लोखंडे,शुभम गव्हले,सुनिल गांडुळे हे होते.
नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम मध्ये गेल्या वर्षभरापासून निःस्वार्थ भावनेतून बेघर निराधार वयोवृद्ध आजी आजोबांना स्वखर्चाने तर कधी लोक वर्गणी किंवा मोजक्याच दात्यांनी दिलेल्या दानावर प्रशांत डोंगरदिवे व त्यांच्या पत्नी रुपाली डोंगरदिवे हे मोफत सेवा देत आहे. या आश्रमाचा मोठया प्रमाणात प्रचार प्रसार होत असल्यामुळे येथे अनेक बेघर निराधार वृद्ध वृद्धाश्रमात येण्यास तयार आहेत परंतु काही अडचणीचा सामना करावा लागत असल्याने दात्यानी पुढे होऊन वृद्धाश्रमास सढळ हाताने मदतीला यावे असे विचार कार्यक्रम चे अध्यक्ष सरपंच भरत जोगदंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे सागर इटकर व इतर सहकार्यानी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मदतीचा हात म्हणून 2.50 क्विंटल गहू व 50 किलो तांदूळ हे धान्य दान दिले. यावेळी सुनील गंडुळे,अमोल सोनुने,सोमनाथ कोलते,दिपक लाऊडकर,शुभम उंबरहांडे,समाधान नांगरे,अरिफ बोरीवाले,विजय इंगळे,शुभम गव्हले,प्रवीण पवार,सागर वैष्णव,गणेश पवार,शुभम तायडे, किरण लोखंडे,वैभव राणा सोळंकी,संतोष नाना इंगळे,उमेश जांभळे,पुरुषोत्तम गावंडे,चेतन देशमुख,राहुल जगधने,कैलास अवकाळे,विशाल कोल्हे यांच्यासह श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.