महिलांनी लघु उद्योग व्यवसाय विकसित करावा : मा.आमदार भानुदास मुरकुटे
प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
जागतिक पातळीवरील बाजारपेठेचा आणि मागणीचा अभ्यास करुन महिलांनी गृहोद्योग व्यवसाय विकसित करावा असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.भाऊ बनकर पा. जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच जिद्द सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शासकीय मसाला मेकिंग कोर्सच्या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या संपन्न झाला. याप्रसंगी श्री. मुरकुटे बोलत होते.
श्रीरामपूर तालुक्यातील महिलांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करावा या हेतूने दि. ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मसाला मेकिंग कोर्सचे आयोजन जिद्द सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्रीताई मुरकुटे व सेजल उद्योग समूहा चे संस्थापक जितेंद्र तोरणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कोर्स करणाऱ्या महिलांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे साहेब जिवडे साहेब खैरनार साहेब दिलावर सय्यद बार्टी अभिनव कुमार सेंट्रल बँक यांचे सहकार्य लाभले