सौ. कविता बाबूराव वाडियार यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या गुणांचा यथोचि सत्कार करण्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका ह्या शाळेत विविध उपक्रम त्या राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर त्या भर देत असतात. त्यात सौ कविता वाडीयार ह्या गुणवंत शिक्षक पुरस्काराच्या मानकरीही ठरल्या आहेत.
श्रीराम सहकारी शिक्षक पतसंस्था मर्यादित देगलूर यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या त्या जिल्हा परिषद शाळा येथे मागील 18 ते 20 वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत
सौ कविता वाडीयार यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण केली असून त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगीन शिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींवर भर दिला आहेत. मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला.
सौ कविता वाडीयार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांची गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सौ वाडीयार यांनी शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी देगलूर बिलोली चे आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या हस्ते शाल श्रीफल प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले