मतमाऊलीची यात्रा मोठ्य उत्सवात संपन्न
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
आज दिनांक ०९,०९,२०२३ रोजी श्रीरामपूर हरेगाव येथील मतमाऊली यात्रेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शुक्रवारी रात्री १२ वाजता हरेगाव येथे मतमाऊली जन्मदिनी हरेगाव धर्मग्रामाचे पॅरिस प्रिस्ट.फा.डामनि.रोझारिओ ,फा.सचिन, फा. रिचर्ड यांनी केक कापून यात्रेच्या उत्साहाला सूरूवात करण्यात आली.त्यानंतर आलेल्या नाशिक, मुंबई, शेवगाव, घोडेगाव,पूणे, अहमदनगर,पूणे, संगमनेर, श्रीरामपूर येथील व त्याचबरोबर इतर खेडेगावातून पदयात्रेने आलेल्या सर्व भाविकांना दर्शन रांगेत दर्शन घेतले.महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून १२ ते १३ वर्षांपासून पदयात्रेकरुसाठी नेहमीप्रमाणे खिचडी चिवडा वाटप करण्यात आले.यावेळी लाखो भाविकांनी फराळाचा आस्वाद घेतला,याप्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दिपक कदम, विश्वस्त अविनाश काळे,प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब तोरणे, राज्य संघटक विशाल पंडीत, तालुकाध्यक्ष प्रकाश निकाळे, तालुका सरचिटणीस प्रमोद शिंदे,सचिन रूपटक्के, संदीप हिवाळे,संदिप साळवे, निशिकांत पंडीत,सागर त्रिभुवन,दिपक साळवे इ.सेवकानी पदयात्रेकरुसाठी सेवा करण्याची जबाबदारी घेण्यात आली.