केंद्रशासन मार्फत विशेष विकास समिती स्थापन करण्यात यावी
मा.ना हंसराज अहिर यांना पोहरागडचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांची निवेदाना द्वारा केली मागणी.
मानोरा.ता.प्र / बाबूसिंग राठोड
वाशीम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत आदिशक्ती जगदंबा माता,संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दिनाक ०६/०९/२०२३ येथे मा.ना हंसराज अहिर (अध्यक्ष रा.मागासवर्गीय आयोग भारत सरकार तथा पूर्व केंद्रीय गुह राज्य मंत्री) आले असता पोहरागडचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांची निवेदाना द्वारा मागणी केली.
सविस्तर वृत असे की,अखिल भारतीय बंजारा समाजातील एकमेव श्रद्धास्थान असलेल्या संत शिरोमणी सेवालाल महाराज याची समाधीस्थळी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरागड धर्मपिठाचा विकास केंद्रशासन मार्फत विशेष विकास समिती स्थापन करून. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी तसेच या समितीमार्फत बंजारा समाजाचे विकासात्मक धोरण ठरविण्यात यावे. तसेच अखिल भारतीय बंजारा समाजाची बोली भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा. संपूर्ण भारतातील बंजारा समाजातील अनेक समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीर्थक्षेत्र पोहरागड धर्मपिठाचा विकास होणे, भारतातील संपूर्ण बंजारा समाजाला एक सूचित आणणे,धर्मातर रोखणे,संस्कृतीचे जतन करणे,क्रिमीनल काडणे इ.समस्येवर धोरणात्मक निर्णय होण्याकरिता केंद्रशासन मार्फत विशेष विकास समिती स्थापन होणे गरजेचे आहे असे आशयाचे निवेदन मा.ना हंसराज अहिर (अध्यक्ष रा.मागासवर्गीय आयोग भारत सरकार तथा पूर्व केंद्रीय गुह राज्य मंत्री) यांना पोहरागडचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी निवेदाना द्वारा मागणी केली.यावेळी गोपाल महाराज (पोहरागड), सदाशिव चव्हाण (पातूर), वामनराव चव्हाण (दिग्रस), शंकर आडे (पत्रकार),राहुल महाराज, भक्तराज महाराज (पोहरागड) आदी मान्यवर उपस्थित होते.