वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा -ऑल ऑल इंडिया पॅंथर सेनेचेकारवाई करण्यासाठी निवेदन
चिखली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतीगृहात गरीब कुटुंबातील 62 मुलींचा प्रवेश आहे. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे वास्तव समोर आलं आहे. या वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून ६ विध्यार्थिनींना उपचारासाठी चिखलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असफल ठरला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र वेगाने पसरली असून सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया भीम पॅंथर सेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ऑल ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या उपस्थितीत तहसीलदारला याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.