Breaking News
recent

महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा

     समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन युवतीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. शुभंकर महापुरे (वय २६,रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी)  असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पीडित युवती परगावची आहे. ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. समाजमाध्यमातून त्याची युवतीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने युवतीला जाळ्यात ओढले. त्याने जेवणासाठी तिला नारायण पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले. जेवण करण्यापूर्वी त्याने तिला मद्य पाजले. मद्य प्यायल्याने युवतीला गुंगी आली. त्यानंतर डॉ. महापुरे याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

Powered by Blogger.