बापू शंकर ढोडरे यांना शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
(सुनिल केदारे ठाणे प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शिक्षक बापू शंकर ढोडरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बापू शंकर ढोडरे हे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा दौऱ्याचा पाडा ता. शहापूर जि. ठाणे येथे कार्यरत असून त त्यांची एकूण सेवा 29 वर्षे झाली आहे. 29 वर्षापासून शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करत आहेत. त्यापैकी सेवेची निम्मी सेवा म्हणजे 17 वर्षे (१९९४ ते २०११) रानविहीर ह्या आदिवासी क्षेत्रात तालुक्यापासुन 40 कि.मी. मीटर अंतर असलेल्या शाळेवर इनामे इतबारे ज्ञानदानाचे पवित्र काम करत होते. त्या काळी शाळेपर्यत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहनांची व्यवस्था नसतांना पायी प्रवास करुन मुलांसाठी ज्ञानदानाचे काम केले आणि सेवेच्या ८ व्या वर्षी शहापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला .ते समाज सहभागातून विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या गरजा ओळखून ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात व इतर शैक्षणिक सेवा मिळवून देतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गड-किल्ल्यांवर शैक्षणिक सहली तसेच शाळा स्तरावर स्नेहसंमेलन विविध स्पर्धा चे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात.
थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी इ.उपक्रम साजरे करताना त्यांनी विशेष सहभाग नोंदविला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी, समाज यांच्या समस्यानुसार त्यांचे प्रबोधन व्हावे म्हणून ते वृत्तपत्र ,लेखन ग्रंथ, लेखन करतात. तसेच राज्यस्तर, जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. शाळेच्या परिसरात एकही मुलगा शाळा बाह्य राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ते नेहमीच तत्पर्य असतात. कोविडच्या काळात शाळा बंद शिक्षण चालू ऑनलाईन,ऑफलाईन ज्ञानदानाचे कार्य करत होते. तसेच प्रभावी अध्ययनासाठी विषयवार शैक्षणिक साहित्य निर्मिती करतात व गणित,भाषा पेटी यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी विविध उपक्रमाचे नियोजन करतात. बापू शंकर ढोडरे हे प्राथमिक शिक्षणाच्या सोबत सामाजिक व धार्मिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत त्यांचा .तसेच ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सुद्धा करत आहेत.त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असतात.तसेच कोविडच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये गरीब व गरजु लोकांना किराणा,धान्य व इतर साहित्य त्यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने वाटप केलेले आहे. अशा या गुणी शिक्षकाचा त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक. संपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले वरील पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.