Breaking News
recent

गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक


 पुणे : गुप्तधन सापडल्याच्या आमिषाने बाणेर भागातील एका व्यावासयिकाची चोरट्यांनी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार बाणेर भागात राहायला आहे. त्यांचे ओैषध विक्रीचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. गुप्तधन सापडल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. सोने-चांदीची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला व्यावसायिक बळी पडला. ३० लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चाकण भागात बोलावून घेतले. पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. व्यावसायिक तेथून घरी आला. त्याने पिशवी उघडून पाहिली. पिशवीतील सोन्याच्या नाण्यांची तपासणी त्यांनी केली. तेव्हा नाणी बनावट असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Powered by Blogger.