भाजपा आमदार सौ.स्वेताताई महाले यांची गणेश एजंन्सीला सदिच्छा भेट.
प्रहारचे तालुका अध्यक्ष शाम पवार यांचे हस्ते सत्कार.
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-धाड मतदार संघातील लोकप्रिय कर्तव्यदक्ष भाजपा आमदार सौ श्वेताताई महाले यांचे सोबत येंडोले अण्णा,गणेश बाजी,विष्णू वाघ स्वीय सहाय्यक सुरेश इंगळे आदी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तथा प्रहारचे तालुका अध्यक्ष शाम अशोक पवार यांचे गणेश एजंन्सीला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष शाम पवार यांनी आमदार श्वेताताई महाले व उपस्थीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाम पवार, गणेश जामदार, राम राऊत, प्रशांत धोञे, रवी राऊत, राम पाठे, प्रशांत पाटील, हितेश राठोड व आदी मित्र मंडळी उपस्थित होते.