संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करा.
रमेश उर्फ सोनू पवार यांचा आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा.
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
बंजारा समाजाचे आराध्य दैवत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या 15 फेब्रुवारी जयंती निमित्त शासकीय सुट्टी मिळावी यासाठी पोहरादेवी व उमरीगड येथून रमेश उर्फ सोनू पवार यांनी दिनाक 26/09/2022 पासून ते दिनाक 12/10/2022 पर्यंत 17 दिवस पदयात्रा करून मा.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना वर्षा बंगल्यावर निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदानाला एक वर्ष पूर्ण झाले असून सुध्दा आता पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.त्या बाबत कुठलेच आदेश झाले नाही. मा.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी निवेदनावर सकारात्मक निर्णय करणार आहे असे म्हटले होते. पण एक वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. अशी खंत सोनू पवार यांनी व्यक्त केली.
रमेश उर्फ सोनू पवार मू.उमरी (खु) ता.मांनोरा जि.वाशिम यांनी दिनाक 21/08/2023 रोजी मा जिल्हा अधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदना प्रमाणे गतवर्षी देण्यात आलेल्या निवेदना नुसार संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 15 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे आदेश,पत्र न काढल्यास दिनांक 30 आक्टोंबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा निवेदना द्वारे दिला आहे.