Breaking News
recent

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा अनेक वर्षांच्या लढ्याला यश


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

भिडेवाडा संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने पर्यायाने राज्य सरकारने जिंकला आहे. भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक करण्याचा प्रश्न सुटला असून तिथे तातडीने काम सुरू होईल,या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल.

स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून तसेच अडी अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचं महान कार्य केलं. भिडे वाड्यात स्त्रियांसाठी शिक्षणाचं द्वार खुलं करून वर्षानुवर्षांच्या अज्ञानाच्या श्रृंखला तोडल्या. त्याच भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. 

परंतु कायदेशीर अडचणींमुळे या स्मारकाचं काम रखडलं होतं,

भिडे वाड्यातील काही भाडेकरूंनी रोख मोबदला मागवला होता. त्याची तयारीही महापालिकेने दर्शवली होती. मात्र, हा वाद कोर्टात गेला. परिणामी या कामाला विलंब होत गेला. अखेर हा खटला पालिकेने जिंकल्याने भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 भिडेवाड्याचे सध्याचे जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

पुणे महानगरपालिकेने हेरिटेज वास्तूंची यादी तयार केली होती, त्या यादीत भिडेवाड्याचा समावेश आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २१ फेब्रुवारी २००६ रोजी मान्यता दिली होती. 

भिडेवाडा दुरुस्तीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी तरतूद करण्यात येत होती. २०१९-२०२० च्या अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेच्या ताब्यात जागा आलेली नव्हती

Powered by Blogger.