पोहरागड येथे होणाऱ्या निर्धार सभेमध्ये लाखोंच्या संख्येने सामिल व्हा! - भोला राठोड शिवसेना संपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :-
(वाशिम) मानोरा या तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत बामणलाल महाराज मंदिर संस्थान परिसरात विमुक्त (अ) प्रवर्गातील अनधिकृत बनावट कागतपत्राच्या आधारे बाळकावलेली बोगस घुसखोरी थांबवून बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येवून नौकरी हडपणाऱ्यावर निलबनाची कार्यवाही करावी, या मागणीसाठी दि.25 ऑक्टोबर 2023 पासून श्री.राजेश राठोड (बुलठाना),श्री.सचिन राठोड (जालना),श्री.श्याम राठोड,श्री.अमोल राठोड या चार आंदोलकर्त्यानी अन्न व जलत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे अन्न व जलत्याग आंदोलनाला स्थळी श्री.राजेश राठोड (बुलठाना),श्री.सचिन राठोड (जालना),श्री.श्याम राठोड,श्री.अमोल राठोड या चार आंदोलकर्त्याना पाठीबा दर्शविण्याकरिता दि.29ऑक्टोबर2023 रोजी समाज बाधवाची निर्धार सभा,बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विमुक्त (अ) प्रवर्गात असलेल्या 14 जातीच्या समाज बांधवाणी लाखोंच्या संख्येत निर्धार सभेला उपस्थित रहावे असे आवाहन भोला राठोड शिवसेना संपर्कप्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.
चलो म बी जारोछु तम बी आवो एकी हेच बळ मा गोर बंजारा भाईयो आब वेळ आईच एक वेयर आपण समाजेर ताकद दकाळेर अभि नही तो कभी नही एक दिवस..आपल्या संवेधाधिक हक्क अधिकारासाठी! येत्या दि.29ऑक्टोबर2023 ला पोहरागड येथे होणाऱ्या निर्धार सभेला संपुर्ण महाराष्ट्रातुन समाज बांधवांनी,समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवुन देण्यासाठी यायचे आहे. पोहरागड येथे होणाऱ्या निर्धार सभेला उपस्थित होऊन साक्षीदार व्हायचे आहे. असे आवाहन भोला राठोड शिवसेना संपर्कप्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.