यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात निवडणुकीपूर्वीच पोस्टर वाॅर
अब कि बार प्रा.प्रवीण पवार नई सोच नई उम्मीद
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम) लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून २०१९ च्या लोकसभेत तिसऱ्या क्रमांकावर असलेले प्रा.प्रवीण पवार यांचे वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात बॅनर सर्वत्र झळकत आहेत. या बॅनर मध्ये अब कि बार प्रा.प्रवीण पवार नई सोच नई उम्मीद, जनसंवाद यात्रा च्या माध्यमातून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात मंतदारा समोर जात आहे. गावोगावी प्रा.पवार यांचे बॅनर दिसत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले की काय असे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षीच्या शेवटच्या महिन्यात प्रा.प्रवीण पवार भाजपवाशी झाले होते. त्यातच त्यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट, कॉँग्रेस पार्टी सह सर्वच पक्ष व्यूव्हरचना आखत आहेत. या निवडणुकीत नव नवीन चहरे उतरू शकतात. राज्यात भाजप कडून मिशन ४५ अभियान राबविण्यात येत आहेत. त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ जिकण्यासाठी भाजप ताकतीने मैदानात उतरला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप जवळील एका खाजगी संस्थे मार्फत लोकसभेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ शिवसेना शिंदे गट अडचणीचे असल्याने उमेदवार बदलावा तसे न झाल्यास भाजप उमेदवार उभा करेल अशी चर्चा वरील स्तरावर बोलल्या जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोऱ्या तालुक्यात गावोगावी अब कि बार प्रा.प्रवीण पवार नई सोच नई उम्मीद अश्या प्रकारचे बॅनर लावण्यात येत आहेत.प्रा.प्रवीण पवार यांचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. प्रा.प्रवीण पवार उच्च विद्या विभूषित आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी वर निवडणूक लंडविळी होती. त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमाकावर होते.आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षा कडून लढवणार हे येणारा काळच सांगेल. मात्र बॅनर वरुण चर्चेला उधाण आले आहे.