मानोरा तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार द्या.
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
मानोरा तालुका हा वाशिम जिल्ह्यातील दुर्गम व मागास तालुका म्हणुन घोषित आहे.तालुक्यामधील सर्व कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून, या ठिकाणी ज्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते ती शिक्षेच्या स्वरूपात नियुक्ती केली जाते, मग त्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चांगले काम होणे अपेक्षित च नाही किंवा एखाद्या अधिकारी यांच्याकडे तात्पुरता प्रमाणात कार्यालय प्रमुख चा पदभार दिला जातो. प्रभार दिलेला अधिकारी व कर्मचारी हा वसुली करणे व दिवस काढण्यात धन्य समजतो मग अशा कारणामुळे मानोरा सारख्या मागास तालुका चा विकास कसा होईल?शेतकरी,बेरोजगार,विद्यार्थी,अपंग आणि निराधार लोकांचे काम मोठया प्रमाणात प्रलंबित राहतात.त्यामुळे तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर चांगले आणि आदर्श असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करा.अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांना महंत संजय महाराज यांच्या नेतृत्वात माजी सरपंच दिलीप चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी निवेदन देऊन केले आहे
याबाबत दिलेल्या निवेदनात मागील तीन वर्षांपासून येथे कायमस्वरूपी तहसीलदार नाही.येथील नायब तहसीलदार राठोड हे मागील वर्षभरापासून प्रभारी तहसीलदार म्हणून गाडा हाकत होते आता त्याचीही महागाव येथे बदली झाल्याने मगरुळपीर येथील नायब तहसीलदार राठोड यांच्या कडे पदभार देण्यात आले आहे.तेव्हा येथे कायमस्वरूपी तहसीलदार व रिक्त नायब तहसीलदाराची पदें तातडीने नियुक्ती करण्याची मागणी शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी निवेदन आपदा नियंत्रण प्राधिकारी (तहसीलदार) कार्यालयात कायमस्वरूपी व पुरुषा संख्येत अधिकारी/कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असताना तालुक्यात कुठल्याही प्रकारची आपदात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्याचे अधिकार असलेले आपता निवारण प्राधिकारी तहसीलदार यांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो महसूल चे कामासाठी आठ आठ दिवस जनतेला तहसील कार्याचे पायरी झिजवावे लागते. तेव्हा या गंभीर बाबीचा विचार करून तालुक्यासाठी राज्य लोकसेवा आयोग द्वारे नेमण्यात आलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर इतर लिपिक वर्गीय वर्गीय कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक करून तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी व नागरिकांना न्याय देण्याची मागणी मनोहर राठोड यांनी केली आहे अन्यथा तहसील कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशाराही निवेदनात मनोहर राठोड यांनी म्हटले आहे