Breaking News
recent

तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन दोघांकडून सामूहिक बलात्कार

  


मुंबई : घरात एकट्या असलेल्या तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन शेजारी राहणाऱ्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मूळची पालघर येथे राहणारी १९ वर्षीय पीडित तरुणी ही तिच्या वडिलांकडे चेंबूर येथे आली होती. ती १७ नोव्हेंबरला घरात एकटीच असताना शेजारी राहणारा ३० वर्षीय आरोपी तिच्याकडे स्वयंपाकाची काही सामग्री मागण्यासाठी आला होता. तरुणीची त्याच्याशी ओळख असल्याने दोघेही घरात गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपीने तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर दुसऱ्या एका मित्राला बोलावून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.तरुणी शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने याबाबत चेंबूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Powered by Blogger.