Breaking News
recent

अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन तरुणाकडे २० लाखांची खंडणी; महिलेविरुद्ध गुन्हा

 


पुणे : अनैतिक संबध उघड करण्याची धमकी देऊन एकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मिनल अविनाश दीक्षित (वय ३०, रा. मानकर काॅलनी, हडपसर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि आरोपी मिनल यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

त्यानंतर तिने गर्भवती असल्याची बतावणी तरुणाकडे केली. ‘माझ्याशी संपर्क तोडल्यास अनैतिक संबंध उघड करेल. तुझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करेल. माझ्याबरोबर असलेले संबंध कायम ठेवावे लागतील,’ असे सांगून तरुणाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. तिच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

 

Powered by Blogger.