दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत मार्फत 5 टक्के निधी/ व राखीव घरकुल मिळण्यासाठी निवेदन
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांची पाच टक्के निधी तात्काळ वितरण करावे अशी मागणी दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन दिव्यांग बांधव यांनी शासनाच्या माध्यमातुन गाव पातळीवर मागील काही दिवसापासुन तालुक्यातील विविध ग्रामपंचायती अंतर्गत अपंग व्याक्तीस त्यांच्या हक्काची पाच टक्के अनुसार दिली जाणारी निधी वितरीत करण्यात येते. मात्र निधी दिली जात नसल्याचे कैफियत यावेळी दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी यांच्या समोर मांडली.
सदरची शासनाकडुन मिळणारी आर्थिक मदत मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने उपासमारीचे प्रसंग ओढवले जात असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष देवुन दिव्यांग नागरीकांच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी दिव्यांग बांधवांशी बोलतांना सांगीतले ..