संत श्री.दोला महाराज वृध्दाश्रम उमरी(पठार) येथे पाहणी.
यवतमाळ :- आर्णी तालुक्यातील उमरी(पठार) येथील श्री. प्रेमदास बामण्या चव्हाण यांनी आपल्या कुटूबासहित संत श्री.दोला महाराज वृध्दाश्रम उमरी(पठार) येथे भेट देवून वृध्दाची भेटी घेऊन त्यांच्या सोईसुवीदे विषयी विचारणा व पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत अशोक राठोड, रोखसिंग राठोड,कुटूबातील बहीण लीलाबाई जयसिंग राठोड(वाईगौळ),सौ.मंदाबाई दत्ता राठोड(शिवानी),सौ.शिलाबाई रोखसिंग राठोड(किन्ही किनारा),सौ.पूनम अशोक राठोड (रामनगर),सौ.वंदना सुरेश राठोड (महाळूगी),सविता ताई यांच्या समवेत पाहणी केली. वृध्दाश्रमात चांगल्या प्रकारे वृध्दाची सोय घेतल्या जाते.त्यांनी या संस्थेच्या व्यवस्थापना बाबत समाधान व्यक्त केले.व या संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले.