Breaking News
recent

बावनबीर येथे ग्रामसेवा सहकारी संस्थेत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी*


तेली समाजाचे आराध्य दैवत तसेच जगतगुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखनकर्ते श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती बावनबीर ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली  प्रथमतः डॉ रविंद्रजी आकोटकार यांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले 

यावेळी,ग्रामसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन दादा पाटील, संचालक, गोपालसेठ अग्रवाल, केशवराव हागे, प्रल्हादभाऊ मनसुटे, दादासाहेब टापरे सहकारी सुतगिरणीचे संचालक गणपतावजी आकोटकार, संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक गणेशभाऊ आकोटकार, दि.नांदुरा अर्बन बँक संग्रामपूर शाखेचे संचालक राजेंद्रजी आकोटकार,गजाननजी निवाणे,सुभाषभाऊ आकोटकार, विशालभाऊ सोनटक्के, ओमप्रकाशजी ढवळे,मयुरभाऊ आकोटकार,अभिषेक ढवळे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

सरते शेवटी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष तथा बावनबीर तेली समाज पंचमंडळाचे कार्यवाहक श्याम आकोटकार यांनी उपस्थित अध्यक्ष, संचालक तसेच समाज बांधवाचे आभार मानले.

Powered by Blogger.