परसबाग : वसाडी (नवी)शाळेचा स्त्युत्य उपक्रम
(वि.प्र.भगवंता चोरे)
जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा वसाडी (नवी) येथे सहशालेय उपक्रमाचा भाग म्हणून परसबाग निर्मिती करून त्यात पालक,टोमॅटो,कोबी,कोथिंबीर, मिरची इत्यादींची लागवड करून शालेय पोषण आहारात त्याचा वापर करून शाळेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.शाळेत पिकवलेला भाजीपाला पिकवण्यासाठी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे,त्यासाठी फवारणी सुद्धा निंबोळी अर्क,इत्यादीचा सेंद्रिय औषधांची केली आहे. पालक,टोमॅटो ,कोबी ही भाजीपाला पिके एवढी जमून आलेली आहेत की एखाद्या तज्ज्ञ शेतकऱ्याला सुद्धा असा प्लॉट जमणार नाही . त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती बरोबरच पालकवर्गातून देखील कौतुक केले जात आहे
यात कार्यानुभवाच्या तासिकेला विद्यार्थी व शिक्षक निंदन,टोमॅटोला दोरी बंधने,पाणी देणे या गोष्टी आनंदाने करतात त्यांनाही या सर्व गोष्टींमुळे वेगळाच आनंद मिळत आहे..! त्यांच्या उपक्रमाचे गटशिक्षाधिकारी पं.स.संग्रामपूर श्री फाळके साहेब यांनीही कौतुक केले आहे असे मुख्याध्यापक डि.एम. सुरत्ने यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे,कारण विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना शेती मातीशी नाळ जोडली जाते तसेच विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडीही निर्माण होण्यास मदत होते.